
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली : भारतीय महिला फुटबॉल संघातील १२ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. तसेच २ खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे चीनी तैपेईविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी १३ खेळाडू उपलब्ध झाले नाही. यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. यामुळे भारताचे उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची संधी हुकली आहे. भारतासाठी सामना महत्त्वाचा होता. परंतु सामना रद्द केला असल्यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.