
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मायक्रोवेव्हमुळे लोकांचा आहार हा केवळ चवदारच झाला नाही तर त्यांच्या अन्नाशी संबंधित अनेक समस्याही दूर झाल्या आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. असे असूनही आजही अनेकांना मायक्रोवेव्हचे काही तोटे माहीत नाहीत.
मायक्रोवेव्हचा वापर आजकाल प्रत्येकांच्या स्वयंपाक घरात केला जातो. तसेच चवदार चविष्ट डिश बनवण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन वापर आपण करत असतो. व्यस्त दिनचर्येमुळे काही लोकं अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हला प्राधान्य देतात.
एकीकडे मायक्रोवेव्ह तुमचे काम सोपे करते. तर दुसरीकडे मायक्रोवेव्हमध्ये काही गोष्टी गरम केल्याने तुमच्या शरीराला अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुमच्यासोबत अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत.
मायक्रोवेव्हमध्ये चिकन गरम करू नये
चिकन किंवा चिकनची कोणतीही डिश मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याने त्यातील प्रोटीन्ससह अनेक पोषक घटक नष्ट होतात. यासोबतच तुम्हाला पोटदुखी आणि जुलाब देखील होऊ शकतात.
अंडी गरम करू नका
उकडलेले अंडे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काही लोकं तत्परतेमुळे मायक्रोवेव्हमध्ये अंडी गरम करू लागतात. पण असे केल्याने अंड्यातील पोषक तत्व पूर्णपणे नष्ट होतात. तसेच मायक्रोवेव्हचे तापमान जास्त असल्याने अंडी फुटण्याची भीती असते.
तेल अजिबात गरम करू नका
मायक्रोवेव्हमध्ये तेल गरम करणे खूप हानिकारक आहे. ओव्हनमध्ये तेल गरम केल्याने त्यातील फॅट तर निघून जातेच, पण ते खराब फॅटमध्येही बदलते. ज्यामुळे तुमच्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते.
मशरूमचे पदार्थ गरम करू नये
साधारणपणे भाज्यांना पोषणाचा खजिना म्हटले जाते. मशरूमचे नाव देखील यापैकी एक आहे. मशरूम डिश केवळ चवदारच नाही तर खूप आरोग्यदायी देखील आहे. पण मायक्रोवेव्हमध्ये मशरूम गरम केल्याने त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि तुमची पचनक्रिया बिघडण्याची शक्यताही वाढते.
भात गरम करू नये
अन्न गरम करताना घाईमुळे बर्याच वेळा आपण मायक्रोवेव्हमध्ये सर्व पदार्थांसह शिजवलेला भात गरम करण्यासाठी ठेवतो. अशातच ओव्हनमध्ये भात गरम केल्याने अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो. वास्तविक मायक्रोवेव्हच्या उच्च तापमानामुळे बॅसिलस नावाचे जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे डायरिया आणि पचनसंस्थेसारख्या समस्या समोर येऊ शकतात.