
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
अळकुटी :- गारखिंडी येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या गारखिंडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचा (१५.००लक्ष रुपये) भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, विकासकामांसाठी शासन दरबारी प्रयत्न करावे लागतात.
विकासकामे कुणी केली हे झाकून राहत नाही जनता हे पहात असते.प्रत्येक गावास केंद्रबिंदू मानून तालुक्यातील विकास कामांची घोडदौड सुरू आहे.राजकारण करत असताना पक्षविरहीत मैत्री टिकविण्याचे काम केले आहे.या व्यक्तिगत संबंधांमुळे आपल्याला तालुक्याचा कायापालट करण्यासाठी मदत होते.त्यामुळे तालुक्याचा विकास करणे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे.
यावेळी अरुणराव ठाणगे, बाबासाहेब खिलारी, किसनराव धुमाळ, सरपंच निवृत्ती चौधरी, उपसरपंच गुलाब चौधरी, चेअरमन विश्वनाथ झिंझाड, बाबाजी खामकर, अर्जुन झिंझाड, सोपान चौधरी, संदिप झिंझाड,बाळू गायकवाड,आनंदा मोरे,संपत निमसाखरे, विलास निमसाखरे, सुभाष शिंदे, संतोष झिंझाड,झिंझाड महाराज, पंढरीनाथ भोसले, दत्ता शिंदे, दत्ता झिंझाड,संपत पोखरकर,बबन चौधरी,धोंडीभाऊ झिंझाड, रामदास चौधरी, मुकुंद गायकवाड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.