
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :-सोमवार दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी कडूस येथे ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभ हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके कार्यक्रमाचे अध्यक्ष असून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका ताई खिलारी, तालुकाप्रमुख विकास रोहोकले व माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले जिल्हा परिषद मध्ये पदाचा व अनुभवाचा उपयोग करून तालुक्यातील विकासाचा रथ मा. आ. विजयराव औटी यांच्या नंतर असाच पुढे चालू ठेवला कार्यकर्त्यांना कमतरता जाणवू दिली नाही याचे नक्कीच समाधान आहे. निधी उपलब्ध करून पारनेर तालुक्यातील विकास कामे मार्गी लावली आहेत , तर येणाऱ्या काळात पाडळी येथील श्रीगोंदा हद्द रास्ता मार्गी लागू व पळवे येथील रस्ता पुढील काळात मार्गी लावू असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले
यामध्ये कडूस येथील जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत पळओढा येथे साठा बंधारा करणे – १५ लक्ष रुपये , स्मशानभूमी विकास करणे – १० लक्ष रुपये, जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे – १५ लक्ष रुपये, कडूस ते येवती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – १५ लक्ष या कार्यक्रमाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला
यावेळी नारायणगव्हाण मा. सरपंच सुरेश बोरुडे सर , कडूस सरपंच मनोज मुंगसे , उपसरपंच छाया रावडे, तसेच कडूस ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य मारुती मुगसे , माजी सरपंच भिवसेन मुंगसे, पूनम नाना मुंगसे ग्रामपंचायत सदस्य कडूस, सुषमा लहानु रावडे ग्रामपंचायत सदस्य, मीना शिवाजी मुंगसे ग्रामपंचायत सदस्य , नारायण संपत नरवडे ग्रामपंचायत सदस्य राखी दीपक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती असलेशा तांजने ग्रामसेविका कडूस , भास्कर मुंगसे, मच्छिंद्र नरवडे ,संदीप दिवटे, विजय रावडे ,संजय रावडे, बी.के. दिवटे, बाबुराव करंजुले, दादाभाऊ दिवटे सर , दादा मुंगसे, गणेश रावडे, महादेव दिवटे, योगेश रावडे, हेमंत रणसिंग, बबन भाऊ दिवटे, श्यामराव मुंगसे, लहानु रावडे, तुषार काळे, लहानु रावडे, संतोष गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्केट कमिटीचे संचालक ॲड युवराज पाटील यांनी केले तर आभार सरपंच मनोज मुंगशे यांनी मानले.