
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
अ. दि. पाटणकर
पुणे :- पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांसह बहुतांश भागात बुधवार दिनांक ०२ फेब्रुवारी रात्री १० ते गुरुवार दि ०३ रात्री १० फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बदं राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दि. ०४ फेब्रुवारी रोजी कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पर्वती जलकेंद्राच्या पर्वती एल. एल. आर. टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे व नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनी लाईनच्या जोडणीचे काम गुरुवारी दि. ०३ रोजी केले जाणार आहे त्यामुळे नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग, भामा आसखेड जलकेंद्र येथील विद्युत व पंपिंग विषयक कामांची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची सूचना महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.