
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.1 नांदुरा तालुक्यात 4 प्राथ आरोग्य केद्र असून त्यापैकी वडणेर भोलजी हे महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केद्र आहे. हे प्राथमिक आरोग्य केद्र नँशनल हायवे 6 वर असल्याने या ठिकाणी अपघात खूप होतात म्हणून येथे डॉक्टर, नर्स , चपराशी हा स्टाँप परीपूर्ण पाहिजे. जिल्ह्यातील सर्व प्राथ. आरोग्य केद्र व्यवस्थित चालले पाहिजे. रूग्णांना चागली सर्वीस भेटली पाहिजे नागरीकांच्या तक्रारी कमीतकमी झाल्या पाहिजेत ही जबाबदारी पदाधिकारी याची आहे त्यापेक्षा ही जि प च्या अधिकारी वर्गाची आहे.
परंतु दुर्दैवाने बुलढाणा जि. प. मधील अधिकारी कोणाताही मागचा पुढचा विचार न करता कर्मचाऱ्यांच्या पैसे घेवून बदल्या करतात. मागील वर्षी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकार्यांने पैसे खावून एकाच झटक्यात वडणेर भोलजी प्राथमिक आरोग्य केद्रात अकरा कर्मचारी कमी असताना पुन्हा अकरा कर्मचाऱ्यांच्या पैसे घेवून बदल्या केल्या होत्या. व त्या अकराच्या बदल्यात एकही कर्मचाऱ्यांची येथे बदली केली नाही म्हणून *वसंतराव भोजने यांनी चार दिवसा अगोदर लवकरात लवकर वडणेर ला ANM द्या अन्यथा वडणेर PHC ला ताला ठोकू असा इशारा दिला होता.
पण चार दिवसात त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही .म्हणून आज वडणेर PHC ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, सरपंच संतोष भाऊ दिघे, सोपान पाटील, ईश्वर पांडव,अनंता सातव, दीपक जुमळे, सोपान पाटील,सहदेव दिवणाले,श्रीकृष्ण नारे व ग्रामपंचायत सदस्य वडणेर यांनी ताला ठोकला त्यावेळी वडणेर पोलीस स्टेशन चे इंचार्ज मानकर साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी, नांदुरा पोलीस स्टेशन चे शिवाजीराव अर्बट,राठोड साहेब,बंदोबस्ता साठी हजर होते.
आता जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत वडणेर PHC ही बंदच राहील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व पण हे जे आम्ही करत आहे हे आपल्याच सोयीसाठी करत आहे हे लक्षात घेऊन आंदोलनात सहभागी व्हा अशे आव्हान सरपंच संतोषभाऊ दिघे यांनी केले आहे