
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.1, १९ फेब्रुवारी २०२२ शिवजयंती उत्साहात साजरी व्हावी या हेतूने नांदुरा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.यावेळी बैठकीला सर्वपक्षीय नेते,सामाजिक कार्यकर्ते,शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी बैठकीचे सूत्र संचालन महेश पांडे यांनी केले तर प्रास्ताविक गणेश धामोडकर यांनी केले.तसेच अमर रमेश पाटील यांनी सभेला संबोधित करत सर्वांना अध्यक्ष तसेच संपूर्ण कार्यकारणीचे पदे घेण्यासाठी जाहीर आवाहन करत योग्य व वेळ देऊन शिवजयंती निर्विघ्न पार पाडण्यासाठी नावे मागितली. यामधे सर्वानुमते ग्रामीण अध्यक्ष पदी अजिंक्य चोपडे,शहर अध्यक्ष पदी प्रमोद हिवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच तालुका कार्यकारणी मधे उपाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर,सागर काटे, सचिव डॉ.शरद पाटील,सहसचिव लक्ष्मण वक्टे,कार्याध्यक्ष अमर रमेश पाटील,संपर्क प्रमुख गणेश धामोडकर, सह संपर्कप्रमुख विशाल घोंगटे,प्रसिद्धी प्रमुख शंकर पाटील,तर शहर कार्यकारणी मधे उपाध्यक्ष पदी ब्रम्हानंद चौधरी,कोषाध्यक्ष गुड्डू राठोड, शहर कार्याध्यक्ष जितू मोरे,शहर सचिव भागवत पेठकर,प्रसिद्धी प्रमुख वैभव कापडे,संपर्क प्रमुख शुभराज डंबेलकर,सहसचिव कुणाल फणसे .सह कार्याध्यक्ष विश्वकर्मा मुरहेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.