
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा परिषद मार्फत केंद्र शासनाने व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कल्याण करी शासन म्हणून या सेवा राज्यातील जनतेला विशेषत ग्रामीण भागातील जनतेला सर्व काळ उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहिले जाते. याकरिता जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. त्यातील प्रमुख्याने ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक इत्यादी त्यांच्या मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे.
यासाठी शासनाने हे सर्व कर्मचारी मुख्यालयी असल्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना ग्रामसभेचा ठराव प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे.शासनाने वारंवार आदेशाद्वारे या संबंधित वेळोवेळी सूचना सुद्धा दिले आहेत.परंतु तरी देखील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील असंख्य ग्रामसेवक मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक इत्यादी मुख्यालयी राहत नाहीत.खूप मोठी लज्जास्पद बाबा हआहे.ग्रामसभेचा खोटा ठराव घेऊन बहुतेक कर्मचारी शासनाची तसेच जनतेची फसवणूक करत आहेत.अशा प्रकारचे खोटे पुरावे देऊन शासनाकडून घर भाडे प्रवास भत्ता तसेच इतर सुविधांचा लाभ हे कर्मचारी घेतात .
अशा प्रकारे हे सर्व कर्मचारी शासनाच्या निधीचा खूप मोठ्या प्रमाणात अपहार करत आहेत, आणि यामुळे सामान्य नागरिकांना खूप जास्त प्रमाणात त्रास होत आहे.सामान्य नागरिकांना ग्रामपंचायत संबंधित कुठलेही काम पडल्यास त्यांना ग्रामपंचायत वर न जाता पहिले ग्रामसेवक साहेब यांना कॉल करून त्यांची वेळ विचारावे लागतील,म्हणजे आपला देश आजाद आहे पण अजून पण या कर्मचारी लोकांची हुकूमशाही चालू आहे असे चित्र दिसत आहे हा मूळ सामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो यामुळे आर्थिक नुकसान पण होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून सामान्य जनतेला त्रास दूर व्हावा व अंजनगाव सर्जी पंचायत समितीच्या अधिनस्त मुख्यालयी न राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता रोखण्यात यावा व ज्यांनी खोटे दाखले देऊन घरभाडे मिळवले अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून सर्व सरकारी निधी शासन तिजोरीत जमा करण्यात यावा.अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी आणि ग्रामसेवक व पंचायत समिती अंजनगाव सुर्जी च्या अधिनस्त येणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून जनतेच्या समस्या सोडवण्यात याव्या यासाठी प्रहार विद्यार्थी संघटनेतर्फे गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना तक्रार निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित प्रहार विद्यार्थी संघटना तालुका प्रमुख ऋत्विक काकड, अनिकेत चिकटे,आदेश सुरातने आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.