
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
राम पाटील क्षीरसागर
लोहा :- शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचा वाढदिवस दिनांक 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार असुन दि.०१/०२/२०२२रोजी शेवडी बा.येथे भव्य महारक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाठी प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर श्री.बाबुराव मोरे (तालुका प्रमुख शिवसेना नांदेड दक्षिण )श्री महादेव मांजरमकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सोनखेड ) या कार्यक्रमाचे आयोजन संगमेश्वर चपटे (शिवा संघटना सर्कल प्रमुख ), अरुण राईकवाडे शिवा संघटना सोनखेड सर्कल व शिवा संघटना शाखा शेवडी बा यांनी केले अशी माहिती अरुण राईकवाडे यांनी दिली.