दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई–: येथील प्रसिद्ध विधीज्ञ कै. अँड.अण्णासाहेब लोमटे(नवाब) यांची जयंती दि.१० ऑक्टोबर रोजी होती.जयंती निमित्त नवाब परिवाराच्या वतीने जीवन आधार भक्ती प्रेम वृद्धाश्रम येथे दोन महिन्याचे किराणा सामान सुपूर्त करुन जयंती साजरी केली.
यादिवशी अँड.अण्णासाहेब लोमटे(नवाब) कुटुंबीयांनी जयंती साजरी करावी म्हणून म्हणून धायगुडा पिंपळा येथील जीवन आधार भक्ती प्रेम वृद्धाश्रम येथील वृद्धांना मदत म्हणून दोन महिन्याचे किराणा सामान देण्याचे निश्चित केले.
त्यानुसार लोमटे(नवाब) कुटुंबीयांनी जीवन आधार भक्ती प्रेम वृद्धाश्रम चालविणारे पवन गिरवलकर व सोमनाथअप्पा गिरवलकर यांचेकडे किराणा सामान सुपूर्द केले.
यावेळी कै.अँड.अण्णासाहेब लोमटे(नवाब) यांचे बंधू दाजीसाहेब लोमटे,राजेसाहेब लोमटे, पुतणे अँड.अजित लोमटे(नवाब), युवा नेते भीमसेन आप्पा लोमटे(नवाब)कुटुंबातील महिला व नातवंडे उपस्थित होते.