
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- तालुक्यातील शिवना सर्कलमध्ये जि. प. सदस्य गजानन राऊत यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन सिल्लोड सोयगाव भाजपा विधानसभा नेते सुरेश बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. खुपटा येथे 18 लक्ष रुपयांचा डांबरी रस्ता, पूल दुरुस्ती, 5 लक्ष रुपये सिमेंट रस्ता, 4 लक्ष शाळा दुरुस्ती, ग्रामपंचायत अंतर्गत पाण्याची टाकी गटार बांधकाम व जळकीबाजार ता सिल्लोड येथे 4 लक्ष रुपये सिमेंट रोड चे विकासकामांचे उदघाटन करण्यात आले याबरोबरच मागील 5 वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांच्या लाभासाठी महत्त्वाची पाऊले उचलून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करण्यात आले.
यामध्ये बुलडाणा अजिंठा महामार्गामुळे दळणवळना चांगला मार्ग उपलब्ध झाला. याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा रुपये मानधन, उज्वला गॅस योजनेतून गरीब महिलांना गॅस कनेक्शन, दोन रुपये की तांदूळ तीन रुपये की गहू, कोरोना काळात मोफत रेशन असे अनेक उपक्रम मोदी सरकारच्या काळात गोरगरिबांसाठी घेण्यात आले.