
दैनिक चालू वार्ता
वानोळा प्रतिनिधी
अजय चव्हाण
नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती यांनी दि. 02 फेब्रुवारी रोजी वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रास धावती भेट दिली. दवाखान्याचे काम फक्त दुरूनच बघून शाल, श्रीफळ व सत्कार घेवून निघून गेले, परंतु बांधकामाची पाहणी करण्याचे कष्ट घेतले नाही.
या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार मा.जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण महर्षी मा. स्व. दत्तरामजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली होती. काही मातब्बर राजकारण्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठिकाणी भेट देवू नये म्हणून सर्व प्रकारचे आटोकाट प्रयत्न केले होते.
सदरील धावत्या दॏर्यात जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय बेळगे, जि. प.सदस्य संजय राठोड,मुख्य कार्यकारी अभियंता सागर तायडे, अभियंता अशोक पवार, डॉ.पंकज नरवाडे, डॉ.शिवाजीराव आत्राम, जी. एम. लामतुरे आरोग्य कर्मचारी, ए. एच.शेख, ए. एन. एम. झाल्टे, पी. यु. चटलेवार, सहाय्यक प्रसराम पवार, वाहन चालक बालाजी चव्हाण, बंजारा छावणी संपादक मास्टर जि. एस.राठोड, दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी अजय चव्हाण यांची उपस्थिती होती.