दैनिक चालु वार्ता
आटपाडी तालुका प्रतिनिधी
दादासो वाक्षे
आटपाडी :- आटपाडी तालुक्यातून नेहमीच नवनवीन गोष्टी अगदी औंधच्या राजाच्या काळापासून पहायला मिळतात खडतर जगण्याचा माणदेश भाग परंतु इथे आदर्शच्या अनेक खाणी आपल्याला पाहायला मिळतात कामत गावातील श्री.शामराव तुकाराम सरक हे संचालक महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन संस्था कामथ व सौ कुसुम शामराव सरक आदर्श माता ,उत्तम गृहिणी यांचे चिरंजीव श्री सचिन स्पर्धा परीक्षेतून आयकर विभागात सेवा बजावतोय आणि नववधू सौ श्वेता ही पेशाने डॉक्टर आहे कुटुंबातील सर्व मुले ,मुली उच्चशिक्षित आहेत सुषमा, राणी व सचिन हे तिघेही उच्च शिक्षण घेऊन नोकरी करतात .
सचिन आणि श्वेता या दोघांचे कालच लग्नकार्य संपन्न झाले आहे या कुटुंबाने आपण सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी , सामाजिक सलोखा राखण्यासाठी एक आपल्या सर्वांच्या समोर एक नवीन आदर्श निर्माण केला त्यांनी ऊस तोडणी साठी आलेले कामगार यांच्या कुटुंबियांना कपड्यांचा आहेर देण्यात आला. तसेच कामगाराच्या कुटुंबातील सर्व लहान मुलांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले .त्याचबरोबर आपल्या नवीन सूनबाईने त्या कुटुंबातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे टॉनिक यांचं वाटप केले.
तसेच त्यांना खाऊ म्हणून लाडू चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरक कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते .तसेच सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब व आटपाडी पंचायत समिती सभापती चे पती जयवंत भाऊ सरगर हे होते तसेच नवरदेवाचे मामा डी.एस. पाटील व मामी सौ. सुमन पाटील हे ही उपस्थितीत होतेया कार्यक्रमाचे सर्वत्र चांगली चर्चा रंगू लागलेली आहे आजकाल आपल्या सगेसोयरे व नातेवाईक यांचे मानसन्मान यावरून रुसवे-फुगवे होतात.
पण पद्धत थोडीशी बाजूला सारून वंचित उपेक्षित लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्याचे काम या कुटुंबीयांनी केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमस्थळी कामथ गावचे विद्यमान सरपंच व माजी सरपंच यासह कामथ गावातील ग्रामस्थ तसेच निंबवडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. दोन्ही सभापती ने सरक कुटुंबाचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या व समाजातील लोकांनी अशे उपक्रमांचे कौतुक व नियोजन करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन,संयोजन आणि उत्कुष्ट सोहळा संपन्न करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते आदर्श शिक्षक , सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके श्री. नानासाहेब झुरे सर