
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवडी बाजीराव येथे संगमेश्वर चपटे , व अरूण राईकवाडे , यांच्या वतीने शेवडी बाजीराव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा मनोहर धोंडे तर , कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर प्रमुख उपस्थिति श्री. वैजनाथ तोनसुरे इंजि. अनिल माळगे (जिल्हा संपर्क प्रमुख शिवा संघटना ) डॉ. कालिदासराव मोरे (जिल्हा परिषद सदस्य नांदेड )श्री.बाबुराव मोरे (तालुका प्रमुख शिवसेना नांदेड दक्षिण )श्री महादेव मांजरमकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सोनखेड ) आदींची उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी स्वतःता होऊन रक्तदान केले.कोरोना या महामारीच्या संकटामुळे आज रक्ताचा तुटवडा पडला आहे, संघटनेच्या माध्यमातून ज्या युवकांनी रक्तदान करुन चांगली सेवा घडवुन आणली असून त्या माध्यमातून कित्येक जणांचे प्राण वाचवण्याचे काम आज या रक्तदान शिबिरातुन झाले. रक्तदान शिबीराचे आयोजन करत राहावे येणाऱ्या काळात रक्तदानाची आडचण भासणार नाही असे यावेळी प्रा मनोहर धोंडे सर यांनी प्रतिपादन केले.
या रक्तदान शिबिरात दुपारपर्यंत 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले व नंतरही रक्तदान प्रकिया चालुच होती .रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी जीवनदान देतो, याचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन एकदा करावे.
– प्रा मनोहर धोंडे
संस्थापक अध्यक्ष शिवा संघटना