
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमधील ४ हजार लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवून देतो, असे अमिष दाखवत औरंगाबादमधील प्रसिद्ध नैवेद्य हॉटेलच्या मालकाला लाखो रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी ७० ते ८० लाख रुपये एडव्हान्स द्यावे लागतील, असे हॉटेल मालकांना सांगण्यात आले.
त्यानुसार नैवेद्य हॉटेलचे मालक भक्तबंधू रामचंद्र पाढी यांना ४१ लाख ५ हजार रुपयांना फसवण्यात आले.
याप्रकरणी आता एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात रजनी रानमारे (रा. प्रतापनगर,औरंगाबाद), संदीप बाबुलाल वाघ (रा. मुलुंड, मुंबई) आणि स्वप्नील भरत नांद्रे (रा. नाशिक) या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.