
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेने भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला . शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती . या मध्ये सत्तारांची सरशी झाली होती. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी दानवेंना आणखी एक जबर धक्का दिला आहे . सोयगाव नगरपंचायतीतील भाजपचे ४ नवनिर्वाचित सदस्य सत्तार यांनी शिवसेनेत खेचून आणले .
नगरपंचायती च्या १७ पैकी ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता भाजपकडील ६ पैकी चार नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे वळवले आहेत.
भाजप च्या रावसाहेब दानवे यांना धक्का –
यंदाची सोयगान नगरपंचायत निवडणूकीत भाजप आणि शिवसेना आमने – सामने होती . शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणुकी प्रतिष्ठेची ठरली होती . अटीतटीच्या या लढतीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. १७ पैकी ११ जागांवर शिवसेनेने बहुमत मिळवून दानवे यांना जोरदार धक्का दिला . त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आणखी डावपेच आखून भाजपचे ४ नगरसेवक शिवसेने कडे वळवले . या चार नगरसेवकांचा आता औपचारिक प्रवेश झाला असून लवकरच ही प्रक्रिया अधिकृत होईल .
भाजपचे आणखी दोन नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर –
सोयगाव निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते . त्यापैकी चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे . तर उर्वरीत दोन नगरसेवकही शिवसेने च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे . हे सदस्य देखील शिवसेनेत आल्यास भाजपचे संख्याबळ शून्यावर पोहोचू शकते . भाजप साठी आणि पर्यायाने दानवेंसाठी ही मोठी नामुष्की ठरू शकते .