
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह परतूर येथे आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी पंचक्रोशीतील सर्व सामाजिक संघटना ,राजकीय पक्ष पदाधिकारी उपस्थित होते , सर्वानुमते अध्यक्ष कृष्णा सोळंके यांची उपाध्यक्षपदी नामदेव तौर, सचिव विष्णू मचाले , कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ , सहसचिव लक्ष्मण बिलहारे , उपाध्यक्ष विष्णू काळे , कोषाध्यक्ष शाम शिंदे , यांची निवड करण्यात आली ,
या वेळी शिवजन्मोत्सवाचे नियोजन करण्यात आले.
शोभायात्रा अर्थात मिरवणूक सकाळी काढण्यात येणार आहे त्यात लहानमुले ,महिला सामील होणार आहेत , लेझीम पथक , देखावे , व शिवकालीन कला सादर करण्यात येणार आहेत , सर्व परतूर आणि परिसरातील शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले या वेळी रमेश सोळंके , महेश नळगे , संपत टकले ,विनायक भिसे , विष्णू शिंदे , सचिन खरात , पांडुरंग नवल,दत्ता सुरुंग , दिपक कदम , सिद्धेश्वर लहाने , विकास खरात, गजानन चवडे, आनंता शिंदे, योगेश मुजमुले, डी एन केवारे व सर्व आजी माजी नगरसेवक , सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी , सर्व सामाजिक संघटना उपस्थित होते.