
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गुणवंत कामगार पुरस्कार 2021- 22 साठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान 5 वर्षे सेवा झालेल्या आणि सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी सदर पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आव्हान कल्याण आयुक्त रविराज इळये यांनी केले आहे.
मंडळाच्याwww.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच कामगार कल्याण केंद्र मध्ये सदर पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहेत महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत कामगार कल्याण निधी करणाऱ्या दुकान कंपन्या कारखाने वर्कशॉप हॉटेल्स उपग्रह बँका आदी मध्ये काम करणारे कामगार कर्मचारी यांना मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी कामगाराची विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान 5 वर्ष सेवा झालेली असणे आवश्यक आहे.
एक्कावन कामगारांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून रुपये 35 हजार स्मृतिचिन्ह आणि मानपत्र से या पुरस्काराचे स्वरुप आहे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळालेल्या च्या 10 वर्षानंतर कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज करता येईल एका कामगाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून रुपये 50हजार स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे मंडळाचा नंबर असलेल्या कामगारांनाwww.public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन नोंदणी प्रिंट व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्र प्रत्यक्ष भेट देऊन सादर करायचे आहे त्या आधारे अर्जदारास संबंधित केंद्रातून अर्जाचा नमुना मोफत दिला जाईल सदर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयास दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत हस्त पोच .टपालाद्वारे सादर करायचा आहे तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील 3 वर्षात बंद पडलेल्या आस्थापनातील कामगारांना संबंधित केंद्रात ऑफलाइन पद्धतीने मंडळाच्या नियमानुसार अर्ज सादर करता येणार आहेत. असे आव्हान महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांनी केली आहे.