
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- अवैध वाळूची होणारी वाहातूक थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे लोहा तालुका प्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी निवेदनाद्वारे लोहा तहसील कार्यालयाचे महसुली विभागाचे नायब तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. लोहा तहसीलचे महसुल विभागाचे नायब तहसीलदार यांना शिवसेना लोहा शहर शाखेच्या वतीने शिवसेनेचे लोहा शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे अशी मागणी केली की, लोहा शहर व तालुक्यात सर्रासपणे.
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर, ट्रॅक्टर आपल्या कार्यालयातील काही तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या चिरीमिरी आशीर्वादाने दिवस – रात्र चालू आहेत. तालुक्यातील तलाठी , मंडळ अधिकारी , हे कार्यालयीन काम न करता वाळु माफियांचे हप्ते घेण्यात गर्क असल्याचे चित्र थेट पाहवयास मिळत आहे. तेव्हा महसूल विभागाच्या नायब तहसिलदारांने याकडे तात्काळ लक्ष देऊन लोहा शहर व तालुक्यातील होणारी अवैध वाळू वाहतूक थांबवावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनाच्या प्रति राज्यांचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व लोहा तहसिलदार यांना ही पाठविल्या आहेत.