
दैनिक चालु वार्ता
नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगावची महिला कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
दक्षिण नांदेडच्या महिला जिल्हाध्यक्षपदी रुपादेवी पाटील तर हदगाव तालुका महिला अध्यक्षपदी पूजा राऊत यांची निवड करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगांव तालुक्याच्या वतीने महिलाच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.
नियुक्ती पत्राचा कार्यक्रम आज दिनांक १ जानेवारी,२०२२ रोजी जुने तहसील कार्यालय समोर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कार्यालय हदगाव येथे पार पडला. यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामीडवार, जिल्हा सरचिटणीस संदीप तुपकरी, हदगाव तालुकाध्यक्ष कैलास तलवारे आणि नवनिर्वाचित महिला जिल्हाध्यक्षा रुपादेवी पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संघाचे महिला तालुका अध्यक्षा पूजा राऊत, तर महिला उपाध्यक्षा सुभद्रा खंदारे आदी महिलांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार, हदगाव तालुका पदाधिकारी सिद्धार्थ वाठोरे, तुषार कांबळे, चंद्रकांत भोरे, विकास राठोड, अरविंद भोरे, केदार दायमा, संजय तोष्णीवाल, पंकज चव्हाण यांच्यासह तालुका, जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.