
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री आनंद रुपनर जिल्हा तांत्रिक छाननी समिती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती मिटिंग मध्ये या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेकरिता तांत्रीक सहमती मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी दिली या गावांच्या अंदाजपत्रकास समितीने मान्यता दिली असून या गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी भुजल सर्वेक्षण शुल्क तात्काळ भरून प्रस्तावित जलकुंभ व विहिरीच्या जागेचे बक्षीस पत्र करण्याकरीता पुढील कार्यवाही तात्काळ करावी ही योजना लवकरात लवकर राबवणे करता माझा प्रयत्न असून लवकरच या गावच्या वाड्या वस्तींचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे असे सभापती दाते यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत पोखरी, पळशी, कर्जुले हर्या , टाकळी ढोकेश्वर, कळस, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, वारणवाडी, हांडेवाडा, कामठवाडी, वडगाव सावताळ, नांदूर पठार, वाडेगव्हाण, मुंगशी, वाघुंडे बुद्रुक, ढवळपुरी या गावांचा समावेश आहे. [अंदाजपत्रकीय रक्कम १. पोखरी -१४५.१९ लक्ष, २. कर्जुले हर्या – ९८.४० लक्ष, ३. टाकळी ढोकेश्वर – १६५ लक्ष, ४. पळशी – १४४ लक्ष, ५. कळस – १११.२४ लक्ष, ६. पिंपरी गवळी – ५४.७८ लक्ष, ७. रांजणगाव मशीद -२८.४० लक्ष, ८. वारणवाडी, हांडेवडा, कामठवाडी – १०४.९७ लक्ष, ९. वडगाव सावताळ -१३३.१५ लक्ष, १०. नांदुर पठार – ८६.०७ लक्ष, ११. वाडेगव्हाण – १३९.९९ लक्ष, १२. मुंगशी – ५०.४१ लक्ष, १३. वाघुंडे बु. – ५४.४६ लक्ष, १४. ढवळपुरी – ६१.६८ लक्ष]