
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा संघटकपदी पारनेर येथील बाळासाहेब कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे.बाळासाहेब कोकाटे हे पारनेर तालुक्यातील मुळचे कर्जुले हर्या येथील असून व्यवसायानिमित्त ते पारनेर शहरात स्थायिक झाले आहेत.कोकाटे हे संपूर्ण पारनेर तालुक्यात नेहमीच सामाजिक प्रश्नांवर व समस्यांवर काम करत असतात.समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ते निश्चितच ग्राहक वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब कोकाटे यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे. अहमदनगर येथील माळीवाडा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बैठक झाली.यावेळी मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड (पुणे),प्रांत सचिव भालचंद्र पाठक (सोलापूर), मावळते अध्यक्ष विलास जगदाळे, महिला अध्यक्ष प्रा.अमिता कोहली, कोषाध्यक्ष सिताराम बोरुडे, सचिव सुरेश रहाणे,व अहमदनगर जिल्ह्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अतुल कु-हाडे तसेच शाहूराव औटी, कारभारी गरड, अशोक शेवाळे, शिरूर ग्राहक पंचायतीचे देवेंद्र जगताप, अशोक मोरे, पंडित मासळकर आदी उपस्थित होते.
जिल्हा संघटक पदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब कोकाटे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना परिस्थितीमुळे झालेल्या कामकाजाचा अनुशेष भरून काढला जाईल.ग्राहकांच्या हिताची कामे सर्व सहमतीने निर्णय घेऊन केली जातील.ग्राहकांच्या रक्षणासाठी व हितासाठी आम्ही सर्व जण मिळून एकत्र काम करू व ग्राहक वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू. शिरुरप्रमाणे नगर येथेही ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.जिल्ह्यात व तालुक्यात ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून संघटन उभे करणार आहे. बैठकीला अखिल भारतीय ग्राहक संरक्षण पंचायतचे प्रविण जोशी, डॉ.रजनीकांत पुंड, दिनेश थोरात, नकुल चंदे, विनायक वाडेकर, हरीभाऊ चौधरी, डॉ.अप्पासाहेब नरोडे, जितेंद्र पितळे,ए.डी.कुलकर्णी, रघुनाथ सातपुते,बन्शीधर आगळे आदी उपस्थित होते.