
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
इंद्रसिंग वसावे
सरपंच ग्रामसेवक ह्यांचाकडे हजार तक्रारी करूनही समस्या काही मिटेना
अक्कलकुवा :- नियमित काही ना काही कारणामूळे चर्चेत असणारे उर्मिलामाळ गाव आज एक वेगळ्याच चर्चेने गाजते आहे,थोडी संतापजनक वाटणारी ही गोष्ट काही साधी नाही,तर सुमारे बारा महिन्यापासून अख्या गावाला पाण्याची सोय करीत आलेले हे एक साधे पंप वर्षाभरापासून नादुरुस्त आहे,एक हंडा भरण्यासाठी सुमारे दहा ते वीस मिनिटांचा कालावधी आणि जर आकाशात ढग आले तर अजूनच प्रताप.पाणी होते पूर्णतः बंद आणि मजेशीर गोष्ट म्हणजे संबंधित समस्येवर तोडगा निघावा पेसा निधीतून नवीन मोटार बदलण्यात यावी ह्यासाठी नियमित गावकरी तक्रारी आणि विंनती करीत राहिलेत.
परंतु आजपर्यंत गावातील नागरिक सदर समस्येवर उत्तर मिळवू शकले नाही,त्यामुळे सर्व गावकऱ्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.गावाची जमा होणारी ग्रामनिधी ही वर्षाला लाखोंचा घरात जाते पेसा निधी सुमारे पाच लाख चा घरात वर्षाला येत असतो हा निधी कोणत्या वाटेला जातो हा उर्मिलामाळ येथील ग्रामस्थ विचारत आहे.
गावातील सर्व ग्रामस्थांची एक साधीची मागणी मोटार बदलण्यात यावी,परंतु त्यालाही एक वर्षाचा कालावधी उलटतो ह्यापेक्षा दुःखद काय?हाच प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसात नवीन मोटार टाकून सदर पंप दुरुस्त करण्यात यावा अन्यथा सर्व गावकरी मिळून तहसीलदार व गटविकास अधिकारी ह्यांचाकडे तक्रारीचा बंडल घेऊन गावकरी पायपीट करतील असा निर्वाणीचा इशारा ॲड सुभाष वळवी ह्यांन्नी दिला आहे.