
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
अ.दि.पाटणकर
पुणे :- पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था म्हणून काम करणाऱ्या पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन लि., पुणे यांच्या पतपेढी २०२२ या दैंनंदिनीचा प्रकाशन सोहळा नुकताच शिवाजीनगर येथील मुख्यालयात पार पडला. गेली १७ वर्षे पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सहकारी पतसंस्थांना दैंनंदिन कामकाजात उपयोगी पडेल अशा प्रकारच्या दैंनंदिनीचे प्रकाशन फेडरेशन कडून केले जात आहे.
यामध्ये सर्व मंत्री महोदय, खाजदार,आमदार, सहकारी संस्था कार्यालये,जिल्हा बँक, जिल्हा परिषद अधिकारी, न्यायालय, हॉस्पिटल्स,ब्लड बँक,दैनिक वृत्तपत्रे, रेल्वे इत्यादी कार्यालयातील महत्वाचे व उपयुक्त संपर्क क्रमांक यांचा समावेश केलेला आहे. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना या दैंनंदिनीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी फेडरेशन कडून जाहीर करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याला पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. विनायकराव तांबे, मानद सचिव श्री. शामराव हुलावळे ,संचालक श्री. तानाजी लवटे, श्री.यतीनकुमार हुले, श्री.जयप्रकाश बेदरे, श्री.चंद्रकांत बहिरट,सेक्रेटरी श्री. शहाजी रानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितिन पाटील उपस्थित होते.