
दैनिक चालु वार्ता
दौंड प्रतिनिधी
अरुण भोई
दौंड. :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे बोलताना म्हणाले की राज्य कोअर कमिटीची मीटिंग दौंड येथे संपन्न झाली .या मिटिंगमध्ये मुळशी तालुकाध्यक्षपदी दशरथ रंगनाथ गावडे यांची व पुरंदर तालुकाध्यक्षपदी रवींद्र भगवान गावडे यांची निवड करण्यात आली .दशरथ गावडे हे मुळशी तालुक्यातील सूस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत आहेत .रवींद्र गावडे हे पुरंदर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा बांदलवाडी येथे कार्यरत आहे .
यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे , राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे,राज्य उपाध्यक्ष संतोष ससाने ,पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण व जिल्हा महासचिव मिलिंद थोरात हे पदाधिकारी उपस्थित होते .नूतन तालुकाध्यक्ष तालुक्यातील सभासदांशी चर्चा करून तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी जाहीर करतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी दिली.