
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- श्री जाधव व्यंकटी गोविंदराव व ईतर माहिती अधिकारी तपास समिती महाराष्ट्र यांनी निवेदन दिले असून, ज्याद्वारे त्यांनी नांदेड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुक्याच्या ठिकाणी न राहता आपल्या सोयीनुसार
ये जा करीत आहेत. व कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी हे सज्जाच्या ठिकाणी निवासाची व्यवस्था होत नसल्यामुळे ते तालुक्याच्या ठिकाणी राहत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.
त्यामुळे शासनातर्फे निवासाची व्यवस्था करावी असे निवेदन केले आहे तरी सदर प्रकरणात उचित कार्यवाही अनुसरून केलेल्या कार्यवाही बाबत संबंधितास अवगत करावे अशी विनंती जाधव व्यंकटी गोविंद यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना केली आहे.