
दैनिक चालु वार्ता
प्रमोद खिरटकर
कोरपना तालुका प्रतिनिधी
कोरपना :- नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात कोरपना तालुका आरोग्य विभागाच्या वतीने इयत्ता नव वि आणि दहावी करिता नुकतेच कोरोना लसीकरण पार पडले यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर टेंबे डॉक्टर चंदनखेडे मलेरिया कर्मचारी कोडापे परिचारिका खोब्रागडे मॅडम आशा सेविका सौ काठे आणि सौ गेडाम चमू उपस्थित होती.
यावेळी विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या एकूण 104 विद्यार्थ्यांना कोरणा ची लस देण्यात आली प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे ज्येष्ठ शिक्षक संदीप गिरडकर रुपेश विरुटकर रामकृष्ण रोगे अजय बारसागडे भारती अग्रहरी प्रमोद वाघाडे प्रवीण कुरसंगे आदींची उपस्थिती होती.