
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी गेवराई
राजेंद्र राठोड
गेवराई :- मराठवाड्याच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षणिक विकासामध्ये कै. आमदार वसंतराव काळे यांचे मोलाचे योगदान राहिली आहे आपल्या अष्टपैलू नेतृत्वाच्या माध्यमातून समाजातील बहुजनाचे सर्वसामान्य मूळ त्यांनी आपल्याशी जोडून त्याने विविध प्रश्न मार्गी लावले विद्यापीठाच्या आवारामध्ये बहुजनाच्या मुलाच्या पायामध्ये ताकद निर्माण करण्याचे काम माजी आमदार वसंतराव काळे यांनी केले असे प्रतिपादन ए आर पाटील यांनी केले येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणक शास्त्र महाविद्यालय मध्ये माजी आमदार वसंतराव जी काळे यांच्या स्मृती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी प्राचार्य ए पाटील बोलत होते.