
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
माधव गोटमवाड
हदगाव :- हदगाव तालुक्यातील मौजे निवळा येथे ग्रामस्थांच्या वतिने अखंड हरिनाम सापत्हा व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात या गावचे भुमीपुत्र ह. भ. प.माऊली महाराज कदम निवळेकर हल्ली मुक्काम मोतीराम महाराज संस्था आळंदी देवाची यांच्या किर्तनाचा कार्यक्रम दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 9 वाजता आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपस्थित भाविकांना घर हे मंदिर आहे. घरातील आई-वडील देव-देवता आहेत. घरातील वयोवृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असा उपदेश किर्तनकार माऊली महाराज कदम निवळेकर यांनी केला.
हदगाव तालुक्यातील निवळा येथे सालाबादप्रमाणे हनुमान मंदिर प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम साप्तहात माऊली महाराज यांचे कीर्तन झाले. त्याप्रसंगी महाराजांनी थोडक्यात शिवचरित्र सांगून घरातील वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. घरातील आई वडिलांना मुलांप्रमाणे सांभाळा. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आहात. कोरोना महामारीत तुम्ही वाचले म्हणून तुमचा पुनर्जन्म म्हणावा लागेल, मदतीपेक्षा आधार द्या, हसत समाधानाने जगा, तरुण वर्गाने कष्टाने कामवा, पर्यावरणाचा समतोल राखा, मन खंबीर ठेवा, आजार होणार नाही. असा उपदेश या प्रसंगी महाराजांनी केला.
करोना महामारीत असंख्य तरुण मृत्युमुखी पडले आहेत. विधवा स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्या, भावजय आई समान असते. त्यांच्या लहान मुलांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक द्या, वाटणी मध्ये त्यांना झुकते माप द्या, गावागावातील शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे तेथे गवत वाढले. पत्त्यांचे अड्डे सुरू झाले, एवढेच नव्हे तर दारूचे अड्डेही सुरू झाले आहेत. ग्रामस्थांनी शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन द्यावे. करोना महामारीमुळे कलाकारांचा र्हास होत चालला आहे. कलाकारांनी संस्कृती जपून ठेवली आहे. कलाकारांना शासनाने मदत केली नाही. परंतु समाजाने कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन माऊली महाराज कदम निवळेकर यांनी केले. यावेळी परिसरातील कोळी, तळणी, चक्री, उमरी, भाटेगाव,या व इतर गावच्या भाविकांनी घेतला.