
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते व तुकाराम तनपुरे फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक तनपुरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आम आदमी पार्टीचे राज्य संघटनमंत्री विजय कुंभार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. दरम्यान या पक्ष प्रवेशात प्रामुख्याने त्यांचे सहकारी लक्ष्मण शिंदे यांनी हि प्रवेश केला.दरम्यान निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने पिंपरी- चिंचवड महानगरपालिकाचे बिगुल वाजू लागले आहेत.दरम्यान आपने महापालिका निवडणुकीत उतरल्याचे या आधीच जाहीर केले आहे.
सामाजिक, राजकीय व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आपकडे एक चांगला राजकीय पर्याय म्हणून पाहात आहेत. आगामी काळात वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक आम आदमी पार्टीत सोडले जाणार आहेत. अशी माहिती आपचे राज्य संघटनमंत्री विजय कुंभार यांनी यावेळी दिली. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष वहाब शेख, शहर प्रमुख यशवंत कांबळे, शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, सचिव किशोर कदम, महिलाध्यक्षा स्मिता पवार, प्रवक्ते कपिल मोरे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.