
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा असलेला तालुका प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने व छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आदिवासींच्या संस्कृतीने नटलेल,मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणारे जव्हार आदिवासींची संस्कृती जपणारे जव्हार पावसाळ्यात इथलं वातावरण मनाला अक्षरशः वेड लावत तुफान कोसळणारा पाऊस दाट धुकं,फेसाळणारे धबधबे पर्यटकांना अक्षरशः मोहून टाकते,जव्हारची विपुल वनसंपदा जव्हारला आणखीन समृद्ध बनवते ब्रिटिशांकित हिंदुस्थानातल्या महाराष्ट्रातील एक जूनं संस्थान म्हणून जव्हारची ओळख ,आजच्या जव्हारला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
ऐतिहासिक आणि संस्थानकालिन वारसा लाभलेला आणि निसर्गाने मुक्त हस्ताने रंगांची उधळण केलेल्या जव्हार शहराला काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाचा ब दर्जा भेट दिला होता,जव्हार तालुक्यात हनुमान पॉइंट,सनसेट पॉईंट,जय विलास पॅलेस,जुना राजवाडा, शिरपामाळ ,दाभोसा धबधबा ,काळमांडवी धबधबा, भुपतगड अशी इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहेत.
निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असत.त्यामुळे पर्यटन विकासासाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती.त्यानुसार जव्हार तालुक्यातील पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी देण्यात देण्यात आली आहे.पर्यटन विकास योजनेअंतर्गत २.५४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.यामध्ये
१) दाभोसा धबधब्याकडे जाण्यासाठी पायऱ्या व रेलिंग करणे-२० लाख.
२) जव्हार ते शिवमंदिर बाळकापरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे- १५ लाख.
३) जव्हार येथील सनसेट पॉईट येथे वाहनतळाचा विकास करणे व सनसेट पॉईट कडे जाणारा रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे.
– २० लाख.
४)जामसर तलावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.-२० लाख.
५) काळमांडवी पर्यटन स्थळ येथील रस्त्याचे काम, संरक्षण भिंत पायऱ्या व रेलिंग बांधणे – ५० लाख.
६)डेंगाचीमेट मातेरा डोंगर वळण रस्त्याला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे-२९.९९ लाख.
७ )जव्हार तालुक्यातील खरवंद ते खडखड रस्त्याची सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत आणि क्रॅशबॅरीयरचे काम करणे
– ३५.०० लाख.
८ ) जव्हार तालुक्यातील खरवंद ते खडखड रस्त्याची सुधारणा करणे -३४.९९ लाख.
९) जामसर पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे कोंक्रिटीकरण करणे बैठक व्यवस्था करणे व सुशोभीकरण करणे.
– ३० लाख.
आदि कामांना २०२१-२२ अंतर्गत पर्यटन विकास योजनेतून पर्यटन विकास होणार भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
यात्रा स्थळासारखे पर्यटन स्थळांना निधी उपलब्ध होण्याची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्राने दिली आहे.
बोगस कामांवर आळा घालण्यासाठी उपाययोजना हवी
सार्वजनिक बांधकाम विभागाने याअगोदर पर्यटन विकासाच्या नावाखाली केलेल्या विकासकामांमध्ये गैरव्यवहार झालेचे उघड झाले आहे.काम न करताच बिल काढणे,एकाच विकासकामांवर अधिक वेळा बिले काढणे असे प्रकार या अगोदर समोर आले आहेत.शेकडो कोटी रुपये निधी वर डल्ला मारला गेला आहे.
त्यामुळे पर्यटन विकासाचा निधी योग्यप्रकारे खर्च केला जावा अशी मागणी केली जाते आहे.
याअगोदर पर्यटन विकासकामांमध्ये गैरव्यवहार झालेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्यटन विकास करतांना दर्जेदार कामे होणे आवश्यक आहे.खूप वेळा शासनाकडे मागणी केली आहे.
-पारस सहाणे
अध्यक्ष-
जव्हार पर्यटन व संवर्धन संस्था