
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
शिऊर :- जे के जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने शिऊर येथे “शिवसंवाद” या शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबीर होणार आहे. दिनांक ४ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी विधानपरिषदेचे आमदार , शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता या शिबिराचे उदघाटन होईल. शिऊर येथील जीवन विकास महाविद्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिरास आमदार रमेश बोरणारे , जे के जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शिऊर येथील ग्रामसचिवालय येथे जे के जाधव यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात येऊन शिवकृपा मंगल कार्यालय येथे शिवसैनिकांचा मेळावा संपन्न होणार आहे. आमदार निधीतील काही विकासकामाचे उदघाटन , लोकार्पण होणार आहे.
आरोग्य शिबीर, कार्यालय उदघाटन व मेळ्याव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.