
दैनिक चालु वार्ता
राजूरा प्रतिनिधी
प्रदिप मडावी
राजूरा :- स्वच्छ सर्वेक्षण 2022 तथा आजादी का अमृत महोत्सव निमित्य नगर परिषद राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर वेशभूषा व डायलॉग स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगर परिषद कार्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि सूर्यकांत पिदूरकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी, न. प. राजुरा यांची उपस्थिती होती.
तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील देशपांडे, माजी उप नगराध्यक्ष न.प. राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, छोटूलाल सोमलकर, स्वच्छता दूत, सत्कारमूर्ती शौर्य पदक प्राप्त सैनिक शंकर गणपती मेंगरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्पर्धेत राजुरा तालुक्यातील अठरा शाळाचे 121 विध्यार्थी सहभागी झाले होते.
देशभक्तीपर वेशभूषा व डायलॉग स्पर्धेत गट क्रमांक- 1 मधे प्रथम क्रमांक आरुषी डवरे, द्वितीय चैतन्य बोबडे, तृतीय दिव्या गावंडे, प्रोत्साहनपर साईचंदना सोमवरपू, प्रिंस कलेगुरवार, गट क्रमांक -2 प्रथम रितू दुपारे, द्वितीय अक्षता आंबीलढगले, तृतीय सानवी मोरे, प्रोत्साहनपर सिद्धान्त शुक्ला, माही चल्लावार, प्रश्नमंजुषा स्पर्धेत गट क्रमांक -1 प्रथम दिप्ताशू रामटेके, द्वितीय श्रेया वरवाडे, तृतीय आरोही भुते, गट क्रमांक – 2 प्रथम क्रमांक भाग्यश्री लोढे, द्वितीय धनश्री कुरेकर, तृतीय अनुष्का बन्सोड यांनी क्रमांक पटकवला. क्रमांकप्राप्त विध्यार्थीना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देण्यात आली.
शौर्य पदक प्राप्त सैनिक शंकर गणपती मेंगरे यांचा आजादी का अमृत महोत्सव निमित्य व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बादल बेले यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार जांभुळकर यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी तर आभार प्रदर्शन संकेत नंदवंशी यांनी मानले.
या कर्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्ञानेश सोनवणे, अश्विनकुमार भोई,आदित्य खापाने , प्रीतम खडसे , विजय जांभुळकर , नागपूर विभाग अध्यक्ष,नेफडो, अल्का सदावर्ते, नागपूर विभाग महिला अध्यक्ष, राष्ट्रीय कला,साहित्य व सांस्कृतीक समिती , संतोष देरकर चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, दिलीप सदावर्ते, संदीप आदे, रजनी शर्मा, सुनैना तांबेकर, आशिष करमरकर , बबलू चव्हान, विलास कुंदोजवार, सर्वानंद वाघमारे, स्वाती देशपांडे, सुनीता उगदे, आकाश वाटेकर, मोहनदास मेश्राम, सचिन मोरे, सुनील रामटेके यांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता नगर परिषद राजुराचे कर्मचारी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सभासदानी अथक परिश्रम घेतले.