
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी सिडको
विक्रम खांडेकर
सिडको :- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आज दिनांक 4 फेब्रुवारी 2022 जिजाऊ सृष्टी सिडको येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते सिडको सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी दिलीपराव कदम तर कोषाध्यक्षपदी विश्वासराव हंबर्डे यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर सचिव बापूसाहेब पाटील ,स्वागताध्यक्ष संग्राम मोरे, कार्याध्यक्ष राजु लांडगे, सह-सचिव वसंत कदम,
उपाध्यक्ष दिपक भरकड, गजानन शिंदे,नितीन भूरे, तिरुपती घोगरे,सह कोषाध्यक्ष भाऊराव कानोले संघटक बालाजी हिवराळे, अशोक कदम, गोविंद मोरे, संजयकुमार गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी विनय पा.गिरडे,संजय पा.घोगरे, जनार्दन गुपीले, वैजनाथ देशमुख,प्रा.अशोक मोरे, सोपान पांडे, संकेत पाटील, साहेबराव गाडे, भगवान ताटे,एस.व्ही.जाधव,बाजीराव पा.कळकेकर हे उपस्थित होते.