
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई : गेहराईंया हा चित्रपट जरी ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार असला तरी त्याची चर्चा जोरात सुरू आहे. याचं कारण, दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील बोल्ड सीन्स. सिद्धांत आणि दीपिकाच्या किसिंग सीन्समुळे या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. अशा प्रकारचे सीन्स देण्यावरून या कलाकारांना नेमकं काय वाटतं, याबाबत काही माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण बऱ्याच काळानंतर चित्रपटात झळकणार आहे. तिची 83 या चित्रपटातील साहाय्यक भूमिका सोडली तर छपाकनंतर ती मोठ्या पडद्यावर झळकली नव्हती. आता ती गेहराइंया या चित्रपटाच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्या प्रश्नांना सिद्धांत चतुर्वेदी याने उत्तरं दिली आहेत. एका मुलाखती दरम्यान त्याने कॅमेऱ्याच्या मागे घडणाऱ्या प्रक्रियेविषयी उलगडा केला आहे. तो म्हणाला की, मला जेव्हा या चित्रपटाची संहिता ऐकवण्यात आली होती.
तेव्हा या सीन्सविषयी त्यात काहीही तपशील नव्हते. पण, जेव्हा आम्ही चित्रीकरण करू लागलो. तेव्हा मात्र, शकुन बत्रासोबत एक इंटिमेट डायरेक्टर देखील हजर होता. मला कळेना की हे नेमकं काय सुरू आहे, तो पुढे म्हणाला. मला जेव्हा कळलं की, मला दीपिकासोबत असे सीन्स द्यायचे आहेत. त्या दीपिकासोबत जिने शाहरूख, रणवीर, रणबीरसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे. या चित्रपटात मला मी कुठेही कमी पडतोय, असं वाटू द्यायचं नव्हतं. मला जेव्हा पहिल्यांदा या सीन्सविषयी कळलं तेव्हा मी घाबरलो होतो.
शकुनने हा चित्रपट असा का बनवायचा ठरवला आहे, हे मला कळत नव्हतं. हळूहळू मला उलगडत गेलं की, त्याला यातून शारीरिक नव्हे तर मानसिक-भावनिक बंध दाखवायचे आहेत, असं सिद्धांत यावेळी म्हणाला. शकुन बत्रा दिग्दर्शित गेहराइंया हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दीपिकासह सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.