
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई : अमिताभ यांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला सोशल मीडियावरही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक छान पोस्ट लिहिली आहे.अमिताभ यांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला सोशल मीडियावरही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक छान पोस्ट लिहिली आहे. अभिषेक बच्चन याला भले आपल्या आई-वडिलांइतकं यश सिनेइंडस्ट्रीत मिळालं नसलं तरी तो उत्तम अभिनेता हे नाकारता येणार नाही. अनेकदा त्याला वडिलांची नकल करायला जातो म्हणूनही दोष दिला गेलाय. पण त्याचे आताचे काही सिनेमे किंवा ओटीटी वरील काही वेबसिरीज पाहिल्या तर अभिनयात एक पाऊल पुढे गेलेला अभिषेक नक्कीच दिसेल.
आजपर्यंत त्यानं किंवा बिग बींनी ही अनेकदा सांगितलं आहे की अभिषेकनं आई-वडिलांच्या नावाचा वापर करून बॉलीवूडमध्ये ना एन्ट्री केली ना कधी सिनेमे मिळवायचा प्रयत्न केला. असं असतं तर आजही तो सिनेमांसाठी स्ट्रगल करताना दिसला नसता. अभिषेक बच्चन याला भले आपल्या आई-वडिलांइतकं यश सिनेइंडस्ट्रीत मिळालं नसलं तरी तो उत्तम अभिनेता हे नाकारता येणार नाही.
अनेकदा त्याला वडिलांची नकल करायला जातो म्हणूनही दोष दिला गेलाय. पण त्याचे आताचे काही सिनेमे किंवा ओटीटी वरील काही वेबसिरीज पाहिल्या तर अभिनयात एक पाऊल पुढे गेलेला अभिषेक नक्कीच दिसेल. आजपर्यंत त्यानं किंवा बिग बींनी ही अनेकदा सांगितलं आहे की अभिषेकनं आई-वडिलांच्या नावाचा वापर करून बॉलीवूडमध्ये ना एन्ट्री केली ना कधी सिनेमे मिळवायचा प्रयत्न केला. असं असतं तर आजही तो सिनेमांसाठी स्ट्रगल करताना दिसला नसता.
अभिषेक बच्चन आज ४६ वर्षांचा झाला. त्यानिमित्तानं अनेक सेलिब्रिटींनी,त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर आज ज्युनिअर बच्चनच्या वाढदिवसा निमित्तानं त्याच्याबद्दलची, त्यानं घेतलेल्या काही कष्टाची माहित नसलेली एक गोष्ट इथे मी सांगणार आहे. अभिषेक परदेशातून शिकून आलेला. सिनेमात यायचं तर होतं पण स्वतःच्या हिमतीवर. काही काम मिळत नाही तोपर्यंत त्यानं घरातील एका नातेवाईकांच्या एलआयसी संदर्भातील बिझनेसमध्ये नशीब आजमवायचा निर्णय घेतला,अन् सुरु झाला त्याचा पहिला स्ट्रगल.
अभिषेक त्यावेळी चक्क एलआयसी एजंट म्हणून काम करायचा. त्याचा पगार हा कमिशनवर ठरलेला होता. पण कदाचित त्याच्या नशिबात स्ट्रगल करून का होईना अभिनेता होणंच लिहिलं होतं. म्हणूनच की काय एलआयसी एजंट म्हणून काम करताना त्याला फार यश मिळालं नाही. अन् तितक्यात त्याच्या वाट्याला त्याचा पहिला सिनेमा आला. आणि मग सुरू झाला ज्युनिअर बच्चनचा बॉलीवूड प्रवास. आज त्याच्या वाढदिवसा निमित्तानं त्याला खूप शुभेच्छा,