
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
तीळ कुळ- पेडालीएसी(“Pedaliaceae”) हे एक फुले येणारे लागवडयोग्य झाड आहे. आफ्रिकेत याचे पुष्कळ जंगली भाउबंद आहेत व भारतातही हे मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या तेलबियांसाठी त्याची बहुतेक सगळीकडे लागवड केली जाते. याची फुले साधारणतः पिवळी असतात मात्र काहीवेळा निळ्या आणि जांभळ्या रंगांची फुलेही या झाडाला आल्याचे आढळते. हे एक बहुवार्षिक झाड असून ते सुमारे ०.५ ते १ मीटर उंच वाढते. याची पाने विरुध्द दिशेला असतात व सुमारे ४ ते १४ सेंटीमीटर लांब असतात. मुळाकडे याची पाने रुंद असून पुष्प-शाखेकडे ती छोटी होत जातात.
फुले ही पांढरी ते जांभळी, नलीकाकार,३ ते ५ सेंटीमीटर लांब व तोंडाशी चार पाकळ्या असणारी असतात. यात असणाऱ्या बिया याच मुख्यत्वेकरुन वापरल्या जातात. या बियांचा रंग सामान्यतः पांढरा, मात्र काहीवेळा किंचित गुलाबी,लालसर व काळाही असतो.या तेलबिया आहेत. याच्यापासून उच्च दर्जाचे खाद्यतेल निघते. तीळ पौष्टिक आहेत, त्यांच्यात स्निग्धपणा आहे म्हणून तिळाचे तेल अंगाला लावतात.भारतात मकर संक्रांतीचे (तिळसंक्रांती) चे दिवशी तिळगुळ वाटण्याचा प्रघात आहे.
तिळाच्या अनेक जंगली जाती आफ्रिकेत सापडतात,परंतु, भारतात याला सर्वप्रथम माणसाने लागवडीखाली आणले. हरप्पा व सिंधु नदी या संस्कृतीत ख्रिस्तपूर्व २२५० व १७५० मध्ये तीळ वापरले जात असल्याचे पुरातत्वशास्त्रीय पुरावे आहेत. हिंदु मान्यतेनुसार,तिळाचे तेलासतुपानंतर दुसरे स्थान आहे. काळे तिळाचा वापरही धार्मिक कार्याततर्पण होतो. शनी देवास तीळाचे तेल वाहण्याची पद्धत आहे.आयुर्वेदात पण याचा पुष्कळ वापर होतो.तिळाच्या तेलाचे मर्दन करून मग अभ्यंग स्नान करतात
पश्चिमी व मध्यपुर्वेकडील देशांत याचा वापर आहे. खाद्यपदार्थात याचा वापर संपूर्ण तीळ वा कुट करुनही होतो.त्याने पदार्थास एक प्रकारचा सुवास येतो. याचा वेगवेगळ्या चटण्या करण्यासाठीपण वापर होतो.बेकरी पदार्थातही याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. .मणीपुर , नागालॅंड,आसाम येथे याचा भरपुर वापर होतो.भारतातल्या अनेक प्रदेशातही हा मुबलक प्रमाणात भोजनात व खाद्यपदार्थात वापरल्या जातो. प्रसिद्ध तिळगुळ यापासुनच बनतो.इतरही देशात याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर आहे,तो त्यापासुन मिळणाऱ्या पोषणमुल्यामुळे.तीळ संक्रातीला मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतात.तिळाच्या पोळ्या,लाडू,चिक्की, काही प्रमाणात भाज्यामध्ये पण वापर केला जातो.
तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत ठेवायला मदत होते. तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्ल जास्त प्रमाणात असते.याच्या तेलातिल आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाहीत.यात लोह ,मॅग्नेशियम ,मॅगनिज ,तांबे ,कॅल्शियम भरपुर प्रमाणात असते. जुन्या काळात बॅबिलॉन येथिल स्त्रिया तरुणपणा व सौंदर्य टिकावे म्हणुन तीळापासुन केलेला हलवा खात असत. रोमन योद्धे बल व उर्जेसाठी याचे सेवन करीत. तीळाचे तेल हे शरीरच्या मसाजस ठी व आरोग्यासाठी वापरतात.अभ्यंग व शिरोधारा या क्रियेसा ठी याचा वापरआयुर्वेद।आयुर्वेदात होतो.यात या तेलालाफारच महत्त्व आहे.
जगात याची सर्वठिकाणी लागवड होते.(20,000 km2). भारतासह अनेक देशात जसे, चिन, म्यानमार, सुदान, इथियोपिया, युगांडा व नायजेरीया. आशिया खंडात याचे उत्पादन सुमारे ७०% आहे तर २६% हे आफ्रिकेत. अमेरीकेच्या टेक्सास प्रांतातही याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले.