
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1) Svalbard Global Seed Vault, नॉर्वेमध्ये भूमिगत तिजोरी बनवण्यात आली असून, ज्यामध्ये जगातील सर्व पिकांच्या बिया ठेवल्या जातात, जेणेकरून भविष्यात जगातील सर्व पिके काही कारणास्तव खराब झाल्यास येथून बियाणे घेता येऊ शकतात.
2) जगातील सर्वांत महाग दात हा आयझॅक न्यूटन यांचा आहे. 1816 मध्ये त्यांचा हा दात 3633 डॉलर ला विकला गेला होता जे की आजच्या हिशोबाने 36000 डॉलर इतके आहेत.
3) सर्वप्रथम कॅशलेस सिस्टम स्वीडनमध्ये वापर सुरू झाला आणि नंतर जगभर वापरला जाऊ लागला.
4) दात हा शरीराचा असा एकमेव भाग की स्वत: ला कधी ही ठीक करू शकत नाही.
5) पेंग्विन खारं पाणी पिऊ शकतात. त्यामुळे त्यांना मर्यादित गोडं पाणी असलेल्या प्रदेशात जगण्यास मदत होते.
6) 1912 मध्ये टायटॅनिक जहाज बुडाल्यामुळे सुमारे 1500 लोक मरण पावले. पण जहाज बुडल्यानंतरही एक बिस्किट वाचला, जो नुकताच लिलावात 15 लाख भारतीय रुपयांना विकला. ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री होणारा महाग बिस्किट आहे.
7) गुजरातमधील नीलांशी पटेल ही जगातील सर्वात लांब केसांची लहान वयाची मुलगी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलं आहे. तिने 12 वर्षानंतर पहिल्यांदा केस कापले आहेत. गेल्यावर्षी तिच्या 18 व्या वाढदिवसाच्या वेळी तिच्या केसांची लांबी 200 मीटर इतकी मोजली गेली होती.
8) डेरियस हा जगातील सर्वात मोठा ससा म्हणून त्याचं नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद आहे. इंग्लडमधील माजी मॉडेल ॲनेट एडवर्ड्स ही त्याची मालकीण आहे. हा ससा 4 फूट 4 इंच इतका मोठा आहे.
9) जपानच्या तैसीरोजिम्मा नावाच्या बेटाला कॅट आयलंड म्हणटले जाते, कारण ह्या बेटावर जर 100 लोक राहत असतील, तर 400 मांजर राहतात. विशेष म्हणजे ह्या बेटावर कुत्र्यांना न्यायला बंदी आहे.
11 ) फ्रान्स हा एक असा देश आहे जिथे एखाद्या मुलीला एखाद्या मुलाने 14 सेकंद पाहिले किंवा तिच्याबद्दल काही चुकीचे वक्तव्य केले तर त्या मुलाला 60 हजार रुपयांचा दंड बसू शकतो.
12) आपल्या शरीरात सुमारे 0.2 मिलीग्राम सोने आहे आणि त्यातील सर्वाधिक प्रमाण रक्तामध्ये आढळते. 40,000 लोकांच्या रक्तातून 8 ग्रॅम सोने काढले जाऊ शकते.
13 ) शिंकताना आपल्या हृदयाचे ठोके एक मिली सेकंदासाठी बंद होतात.
14 ) भारतातील काही भागात गुलाबी हत्ती आढळून येतात. हत्ती किड्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वतः अंगावर लाल माती टाकतात त्यामुळे त्यांचा रंग गुलाबी होतो.
15 ) “बॉटोक्स” हा जगातील सर्वात खतरनाक विष मानला जातो. या विषाची केवळ 4 ग्रॅम इतकी मात्रा पृथ्वीवरील संपूर्ण मानवजातीचा सर्वनाश करू शकते.
16 ) जेव्हा आपण रात्रभर झोप घेऊन सकाळी झोपेतून उठण्याआधी तुमची उंची 1 सेंटीमीटर वाढलेली असते. असे अशामुळे होते की, दिवसा तुमच्या हाडांमध सॉफ्ट कार्टिलेज हे संकुचित होत असते.
17 ) गणितज्ज्ञांच्या एका समुहाने जाहीर केलेल्या माहितीनुसार एका सामान्य Tie ला 1,77,147 वेगवेगळ्या प्रकारे बांधले जाऊ शकते.
18 ) संशोधकांच्या मते, स्वतःला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आरशात पाहिल्याने माणसाचा चिंतातूरपणा वाढतो.
19 ) मानवाचे डोळे एका मिनिटात 17 वेळा, एका दिवसात 14 हजार 280 तर एका वर्षात 52 लाख वेळा उघडझाप करतात.
20) भारतातील नवापूर रेल्वे स्टेशन हे एकमेव असे स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा भाग गुजरात राज्याच्या सीमेमध्ये येते.
21) जेव्हा मायक्रोवेव्हचा शोध लागला, तेव्हा त्यात प्रथम शिजवलेले पदार्थ पॉपकॉर्न होते!