
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
अ.दि.पाटणकर
पुणे :- पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक असलेले गणेश भिंताडे यांचे अल्पशा आजाराने दि.०७ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजता निधन झाले प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते.०६ फेब्रुवारीच्या सकाळीच त्यांनी स्वतः समाजमाध्यमांवर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली होती तर भारतीय क्रिकेट खेळाडूंनी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदनही केले होते. २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवली होती मात्र अत्यंत कमी फरकाने त्यांना पराजय पत्करावा लागला होता.ते समाजकार्यात कायमच अग्रेसर असल्याने त्यांचा युवावर्गावर विशेष प्रभाव होता.
त्यामुळेच युवावर्गाकडूनही त्यांना नेहमीच उस्फुर्त प्रतिसाद मिळत राहिला त्याच बळावर आगामी २०२२ च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी चालू केली होती मात्र त्यापूर्वीच त्यांना मृत्यूने कवटाळले त्यांच्या कमी वयातील जाण्याने पुण्यातील बांधकाम क्षेत्रासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्यावर धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बांधकाम, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंतांसह त्यांना मानणारा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.