
दैनिक चालु वार्ता
भिगवण प्रतिनिधी
जुबेर शेख
भिगवण :- ठाणे पोलीस दलात शिपाई या पदावर कार्यरत असणारे डिकसळ ( ता.इंदापुर) गावचे सुपुत्र महेश मच्छिंद्र मोरे ( वय २७) यांचे गुरुवार ( दि.३ ) रोजी सकाळी शाररीक कसरती करताना आकस्मित निधन झाले होते.मोरे हे ठाणे पोलीस दलातील शीघ्र कृती दलात कार्यरत होते.गुरुवारी पहाटे ते मॉर्निंग कसरती करत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले व ते जमिनीवर कोसळले.त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले होते परंतु रूग्णालयात पोहोचण्या पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गुरुवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर पोलीस मानवंदना देऊन डिकसळ या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रविवार( दिनांक ६ ) रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,पुणे जिल्हा राष्ट्रवादी खजिनदार सचिन बोगावत,इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड,इंदापूर तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस रावसाहेब गवळी,पोलीस पाटील संदीप पवार ,डिकसळ योगेश्वरी सोसायटीचे मा. चेअरमन अर्जुन सुर्यवंशी, डिकसळ उपसरपंच सुनिता गवळी,मदनवाडी सोसायटी चेअरमन विष्णुपंत देवकाते,डिकसळ गावचे मा. उपसरपंच लक्ष्मण कुंभार,सुरेश बिंबे,मा.उपसरपंच अजिनाथ गायकवाड,अनिल पोंद्कुले,हेमंत कुंभार,दत्तात्रय पवार ,सागर आटोळे, संजय भादेकर,संपत पवार,आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.