
दैनिक चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ भुस्से
अर्धापूर :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता.१०) रोजी अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा प्रतोद विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड महानगरपालिका स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगरसेवक छत्रपती कानोडे, डाॅ.विशाल लंगडे, गाजी काजी, सोनाजीराव सरोदे, मुसवीर खतीब, व्यंकटी राऊत, मूकक्तदिर पठाण, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी, शंकरराव ढगे, बबनराव लोखंडे, जगन्नाथ शेटे, आदी उपस्थित होते.