
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कामळज :- कामळज (ता. लोहा) येथे गुरुवर्य मामासाहेब महाराज मारतळेकर यांच्या कृपाशीर्वादाने व समगीर महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. त्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (ता. ११) पर्यंत सदर सप्ताह चालणार आहे. त्यात पहाटे काकडा भजन व आरती, त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा व सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन होणार आहेत.
त्यात भागवताचार्य बापू कागदे महाराज, वासुदेव महाराज कोलंबीकर, शैलेश देशमुख महाराज कामठेकर, भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, बालाजी महाराज गुडेवार, विश्वनाथ महाराज काकांडीकर, मुक्ताई माऊली उदगीरकर सहभागी होत आहेत. तर शुक्रवारी (ता. ११) सकाळी काल्याचे किर्तन विलास महाराज गजगे यांचे होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.