
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
सावरगांव :- कळका फाटा ते सावरगांव हा रस्ता वनविभाग व बांधकाम विभाग यांच्या उदासीन धोरणामुळे गेल्या एक वर्षा पासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे पेठवडज सर्कल व मुखेड तालुक्यातील नागरीकांना आर्थीक व शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेक रोग होत आहेत. तसेच खड्यामुळे पाठीचे हाड व मान दुखीचे त्रास झाल्यामुळे दवाखान्याचा खर्च सहन करावा लागत आहे आणि खड्यामुळे वाहन नादुरुस्त होऊन ज्येष्ठ नागरीक,विद्यार्थी, गरोदर महीला,लहान बालक यांना वेळप्रसंगी जीव सुद्धा गमवावा लागत आहे.
खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कळका फाट्याच्या थोडे समोर अदृश वळण नागमोडी असून ररस्ता उकरून ठेवल्यामुळे अपघात होत आहेत. वनविभाची परवानगी न घेता सार्वजनीक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम चालू केले परंतु परवानगी न घेतल्यामुळे वनविभागाने रस्त्याचे काम बंद केले आहे. दोन्हीही सरकारी विभागामुळे पेठवडज तसेच मुखेड व कंधार तालूक्यातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तेव्हा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीच सार्वजनिक बांधकाम मंत्री असून तसेच नांदेड जिल्हाचे आदरणीय मान्यवर खासदार यांचा बालेकिल्ला आहे तेव्हा दोन्ही आदरणीय पालकमंत्री व खासदार साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,पेठवडज सर्कलमधील सर्व सरपंच व उपसरपंच यांनी या रस्त्याचा प्रश्नमार्गी लावून पेठवडज सर्कल, मुखेड,कंधार जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता करून देण्याची मागणी नागरीक (प्रवाशी) करीत आहेत.