
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- साकलीऊमर ग्रामपंचायतीतील जुनवाणी गावांतील शेतकऱ्यांनी इतर वर्षा प्रमाणे या वर्षी ही बाहागोऱ्या देवस्थानच्या पायथ्याशी असलेल्या उंगलकुंडी जवळ बहू उपयोगी वनराई बंधारा साकार केला आहे. जुनवाणी गावांतील शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या गावांत उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता यावी म्हणून या वर्षी शेतकरी बांधवांनी दगडी बांधाचा आधार देऊन सुंदर वनराई बंधारा साकार केला आहे.
या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतकरी आपल्या जुनवाणी गावातील उन्हाळी शेती पिकांसाठी करणार आहे.त्याच प्रमाणे या वनराई बंधाऱ्यांचे पाणी खालपाडा व जुनवाणी गावातील जनावरांना पिण्यासाठी सोईचे होणार आहे.त्याच प्रमाणे ह्या पाण्याचे उपयोग जलकुंडात टाकून त्या पाण्याच्या उपयोग शेतकरी आपल्या परिसरात लावलेल्या झाडांना व भाजीपाला लागवडीसाठी करणार आहेत.
या बंधाऱ्यासाठी गावांतील युवा शेतकरी ओल्या पाडवी,दमण्या पाडवी,डेमशा पाडवी,गोंड्या पाडवी,इरमा पाडवी,दोंग्या पाडवी,रामा वसावे, दिलीप वसावे,रायसिंग पाडवी व मोलगी परिसर सेवा समितीचे सहकार्य लाभले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व बार्टीचे अक्कलकुवा,धडगांव तालुका समन्वयक ब्रिजलाल पाडवी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.