
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
धडगांव :- रोजी धडगांव तालुक्यातील नर्मदा नदी किनारी भूषा पाईंट वरिल माँ नर्मदा माता मंदीराचे बांधकाम काही महिन्यापासून चालु होते व मंदीराचे बांधकाम पुर्णास्तवात आल्यावर मंदीरात मुर्ती बसविण्या करिता दि.07/02/2022 रोजी माँ नर्मदा माता मुर्ती प्रतिष्ठाण सोहाळा आयोजन करुन प्रत्येक्षा धार्मीक विधीवत पुजंन तसेच भोजनी मंडळीसह गुणगान करत मंदीरात मुर्ती बसविण्यात आली.
माँ नर्मदा माता मंदीर बांधकाम करण्यापुर्वी महाराष्र्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्हात एकही नर्मदा नदी किनारी मंदीर नव्होता त्यामुळे महाराष्र्ट्र राज्यात नर्मदा नदीच्या हद्दीत पुर्व ते पश्चिम मधील अंतर 54 किलोमीटर असून नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला मंदीर बांधकामासाठी तसेच रस्त्याची सोय पाहून मंदीर बांधण्यासाठी योग्य अशी स्थळ पाहून धडगांव तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेले 23-25 किलोमीटर अंतरावर भूषा हे गाव निवडूण या गावाला लागून नर्मदा नदी आहे.
मंदीर हा भूषा पाईंट नर्मदा नदीपासून 200 मीटर अंतरावर मंदीराचे बांधकाम करण्यात आले. सर्व माँ नर्मदा मातेच्या भक्तांनी एक बैठक घेवून नर्मदा नदी किनारी दक्षिण दिशेला एक माँ नर्मदा माता मंदीर बांधकाम करण्यासाठी निश्चय घेतला होता. यात सर्वात मोठे सहकार्य भूषा, खर्डी, हक्तारा,माल, सावर्या-दिगर शेलगदा, गेंदा, बिलगांव, भमाणा, उडद्या-बादल, सावर्या-लेखडा, आदी ग्रामस्थांनी या मंदीर बांधकामाकडे जातीने लक्ष देवून मंदीर उभारण्याकरिता मोठे परिश्रम घेतले दिसून येते.
माँ नर्मदा मंदीर उभारण्याकरिता खुप मोठा निधी लागणार होता पण स्थानिक भूषा, खर्डी, माल, सावर्या-दिगर येथील धार्मीक भक्तांनी तसेच सामाजिक कार्यक्रर्तांनी मंदीरासाठी निधी जमा करण्याकरिता समिती नेमली व या समिती मार्फत धडगांव तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शासकीय, संत-महंत, व्यापारी आदी क्षेञातील दानशुर मान्यवराकडून निधी जमा करुन मंदीराचे बांधकाम पुर्ण केले.
या मंदीर बांधकामा वेळी काही दानशुरांनी आप-आपल्या परिने रेती-खडी-सळाई-सिमेंट-विटा व मुर्तीसह इतर बांधकाम साहित्य तसेच पदार्थसह दानशुर व्याक्तींनी मंदीर बांधकामाकरिता दान दिले.
यावेळी भूषा,खर्डी,माल, सावर्या-दिगर गावासह धडगांव , तळोदा, शाहादा तालुक्यातील खुप मोठ्या संख्येने भक्त हे माँ नर्मदा माताच्या दर्शनासाठी उपस्थित होते.