
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
अतनूर :- त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतनूर येथे रमाबाई आंबेडकर यांना ग्रामपंचायत सदस्य सौ. दैवशाला साहेबराव गव्हाणे-पाटील, माजी प्राचार्य रामचंद्र तोडकर, सेवानिवृत्त मुंबई पोलीस उपायुक्त गणेश रेकुळवाड, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, सहशिक्षक दिलीप पाटील, भारतीय जनता पक्षाचे नेते सुर्यकांत पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष इस्माईल मुंजेवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, मैफुज मुंजेवार, फय्याज मुंजेवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुकाध्यक्ष विनोद भाऊ कांबळे, साहेबराव गव्हाणे-पाटील, लोकमतचे पत्रकार किशन मुगदळे, विजय पाटील गव्हाणे, मुक्तेश्वर येवरे, सरपंच चंद्रशेखर गव्हाणे पाटील, प्रभाकर गायकवाड, विठ्ठल बारसुळे, उपसरपंच बाबुराव कापसे, सहशिक्षक नामदेव गायकवाड, माजी सरपंच गंगाधर वाघमारे, नितीन सोमुसे, बालाजी येवरे, संग्राम घुमाडे या सर्वांनी माता रमाबाई यांना अभिवादन केले. या ठिकाणी भीम गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजक विनोद कांबळे, पंकज गायकवाड, गौतम गायकवाड, गणेश गायकवाड यांनी केले.