
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- दि.०८ देगलुर शहरालगत चाकूर फाटय़जवळ काल रात्री अंदाजे ११.०० ते१२.०० च्या दरम्यान अज्ञात वाहनाने एका अनोळखी इसमास धडक दिली. या बाबत सविस्तर वृत्त काल रात्री दि.०७ फेब्रुवारी रोजी देगलुर जवळील बल्लुर फाटा ते चाकूर फाटयापासुन जवळच्या अंतरावर एका अज्ञात वाहनाने एका अनोळखी इसमास धडक देवुन पसार झाला असुन त्या धडकेमध्ये त्या इसमाचा मृत्यू झाला आहे.
सदर घटना देगलुर पोलीस स्टेशनला कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन त्या इसमाचे प्रेत देगलुर ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी घेवुन गेले आहेत. या इसमाची कोणास ओळख पटल्यास देगलुर पोलीस ठाण्यात संपर्क करावा या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परगेवार मो.९०२८८४६६९१ हे करीत आहेत.