
दैनिक चालु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी
शहाबाज मुजावर
कोल्हापूर :- विशाळगड वरून मिरजेकडे जात असताना सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट जवळ दुपारी ३:३० च्या दरम्यान हा अपघात घडला आहे, तो अपघात घडला आहे ती रिक्षा रस्ता सोडून पलटी होऊन तीस ते चाळीस फुट दरीमध्ये गेली तसेच हे लोक विशाळगड दर्गा हुन मिरजेकडे जात असताना आंबा घाटात हा अपघात घडला आहे रिक्षा ब्रेक फिल्म झाल्यामुळे अपघात झाला असे कळाले आहे. हे लोक शनिवारी विशाळगडला पाच रिक्षा करून १५ लोक आले होते व रविवारी दोनच्या दरम्यान विशाळगडावर ऊन आपल्या गावी जात होते.
वाटेत काळाने घाला घातला व संपूर्ण कुटुंब उध्वस्त केले. या अपघाताने अत्यंत वाईट घटना घडली आहे. संपूर्ण भागात हळहळ व्यक्त होत आहे.या अपघातात हिनाकौसर सरफराज मुसा ही महिला जागीच ठार झाली आहे. तर रिक्षा ड्रायव्हर इनायत अगबर झारे ,रा मिरज हा जखमी झाला आहे. व या महिला चा पती सरफराज अतिदक्षता विभागामध्ये आहे.तसेच त्याच्या दोन लहान मुला ना सुद्धा चांगल्या प्रमाणात लागले आहे.
बचावकार्यासाठी त्यांचीच बरोबर आलेले लोक व जवळच्या गावातीली लोक मुळे दरीत पडलेला मुलांना शोधणे सोपे झाले होते. या सर्वांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते व त्यानंतर कोल्हापूर सीपीआर मध्ये पाठवण्यात आले होते. रात्री १:४०,च्या दरम्यान उशिरा शाहूवाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रेडीडेकर व कॉन्स्टेबल सिंघन करत आहेत.