
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा दि 7 :- त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निम्मीत्त स्थनिक मिलींद नगर येथे अभिवादन करण्यात आले.
मिलींद नगर येथील महाकवी वामनदादा कर्डक सभागृह मध्ये अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन उपस्थित सर्वांनी सामुहिक धम्म वंदना घेतली. या मंगल प्रसंगी वार्डातील जेष्ट नागरिकांनी माता रमाई यांचे महत्व व समजासाठी केलेले कार्य सर्वांना सांगितले.
या वेळी बाळकृष्ण खरात, नारायण वाघ, डॉ.उत्तमराव वानखेडे, कैलास बेंडवाल, वसंता मघाडे, लताताई पैठणकर, कमलबाई वानखेडे, कौशल्याबाई हिवाळे, वेणूताई वानखडे, कविता वानखडे, सिद्धार्थ तायडे, गोविंदा सांबरे, राजु जावळे, निलेश पैठणकर, वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष मिलींद वानखडे, लखन साळवे, सचिन वाघोदे, निलेश गायकवाड, राजु खरात, दिनेश वाघ, आकाश निकम यांचे सह वार्डातील उपासक-उपसिका यांची उपस्थिती होती.