
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी येथील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील अंजनगाव सुर्जी शहरातील व पांढरी येथील बुधवारा भागात गोमास विक्री करताना आज दि. ६ फेब्रुवारी ला सकाळी ९:३० सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी गोमास विक्री करणाऱ्यांना गोमाससह ताब्यात घेऊन कार्यवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार असे की पेट्रोलिंग करत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील सुर्जी भागातील बुधवारा भागात मज्जिद जवळ एक इसम गोमास विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या आधारावर ठाणेदार दिपक वानखडे मार्गदर्शनात ए.पी.आय. विशाल पोळकर यांच्या नेतृत्वाखाली पी.एस.आय प्रल्हाद पवार व पो.हे.कॉ. रंजीत राठोड, दिपाली तेलगोटे, प्रवीण तायडे यांनी आरोपी मोबीन मोहम्मद अब्दुल नवाब वय ३४ रा. बुधवारा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४० किलो गोवंश मास व इतर साहित्य अंदाजे किंमत ८२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असून आरोपीवर कलम ५( ब ),५( क ), ९९ (अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
तर दुसरीकडे तालुक्यातील पांढरी येथे मिळालेल्या माहितीनुसार गावातील जामा मस्जिद जवळ एक इसम गोमास विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर ठाणेदार दिपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात ए.पी.आय.विशाल पोळकर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय इम्रान इनामदार , पो.हे.कॉ. विजय शेवतकर, पो.कॉ. गोपाल सोळंके,पो.कॉ. विजय निमकर्डे , पो.कॉ.हर्षा यादव यांनी आरोपी शेख अयुब कुरेशी शेख मोहम्मद कुरेशी वय ६१ राहणार काकडा याला ताब्यात घेऊन जनावराचे ११० किलो मास व इतर साहित्य असे एकूण २३ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी वर कलम ५,५(ब),५(क)९,९(अ) नूसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहे.